

प्रतिनिधी: नागेंद्र म्हात्रे (आवरे) :
जगातील खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात असतो कारण आपल्या देण्याच्या दातृत्वच्या कृतीने जर दुसऱ्याला किंवा गरजवंताला लाभ होत असेल तर असे कार्य हे ईश्वराच्या दरबारात प्रिय असते निमित्त होते सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड याच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या मध्ये प्रामुख्याने सातवी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ पर साहित्य शैक्षणिक पॅड पट्टी व पेन अस साहित्य देण्यात आलं वाढदिवस म्हटला की पार्टी या सर्व गोष्टीवर मात करत निवास गावंड सर गेले बारा वर्ष आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून त्यावर वायफळ खर्च न करता त्याच पैशातून सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात आज देखील आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद आवरे शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटप करण्यात आले सदर प्रसंगी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक गणेश गावंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निवास गावंड सर हे उत्तम शिक्षक तर आहेत पण विविध प्रकारच्या कला त्यांच्यात आहेत तर नागेंद्र सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रा जि प शाळा ही अतिशय चांगल्या प्रकारची शाळा आहे शाळेतील शिक्षक गुणवंत आहेत व मला या विभागात प्लास्टिक मुक्त अभियान राबवायच आहे तर बबन पाटील सर यावेळी शाळेत होणारे विविध उपक्रम या बाबत चर्चा करून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी रा जि प शाळा आवरे चे मुख्याध्यापक श्री बबन पाटील, शिक्षक निर्भय म्हात्रे सर , गणेशप्रसाद गावंड सर , अरुणा पाटील मॅडम , सीमा कोल्हे मॅडम, पूजा चव्हाण,मॅडम आहेर सर, तसेच शालेय कमिटी सदस्या अलका गावड, राजेश्री पाटील, सदाबहार दोस्ती ग्रुप चे हरिश्चंद्र म्हात्रे,निवास गावंड सर ,सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री निर्भय म्हात्रे सर यांनी केले.

Be First to Comment