Press "Enter" to skip to content

शिवप्रेमींमध्ये उसळली संतापाची लाट

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून दर्गा असल्याचा बनाव करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल 

पेण दि. १६  (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील पायदळाचे सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून ती दर्गा असल्याचा बनाव करणाऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पेण शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात शिवकालीन सरदार वाघोजी तुपे यांची समाधी आहे. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी काही समाजकंटकांनी एकत्र येत सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून, फुले वाहून ती दर्गा असल्याचा बनाव करून नारे तकबीर, अल्लाहूअकबर अश्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.

विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.एकतर 25 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असताना शुक्रवार 28 फेब्रुवारी काही युवकांनी जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून घोषणाबाजी करून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याची तक्रार शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हा संघटक नरेश गावंड, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्वरूप घोसाळकर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे रोशन टेमघरे, मयूर वनगे, रोशन पाटील यांच्यासह शिवप्रेमींनी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.

त्याच प्रमाणे नरहरी सरदार वाघोजी तुपे यांचे वंशज विवेक मारुती तुपे यांनी देखील पेण पोलीस ठाण्यात परिसर तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अखिल पठाण, दानिश पठाण, रफिक तडवी व इतर चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 298, 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या आरोपींना अटक करून पुढील कारवाई करावी तसेच प्रशासनाने समाधीचे पावित्र्य जपावे - स्वरूप घोसाळकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट

शासनाने सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे जिर्णोद्धार व संवर्धन करावे तसेच त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी शौर्य दिन साजरा करावा.

प्रसाद भोईर – शिवसेनेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.