स्वर्गीय लोकनेते श्री दि बा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले होते.
अपोलो हॉस्पिटल, मेडीकव्हर हॉस्पिटल, न्यु ईरा हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल यांचे तज्ञ डॉक्टर या शिबिराला आरोग्य सेवेसाठी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत औषध रुग्णांना देण्यात आली. यावेळी पनवेल मधील तज्ञ डॉ.गिरीश गुणे यांच्यासोबतच पनवेल मधील डॉ.निलेश बांठीया, डॉ.मुकुंद थोरात, डॉ.नितीन म्हात्रे, डॉ.पुष्कर लिखिते, डॉ.लक्ष्मण आवटे, डॉ.सायली म्हात्रे, डॉ.शैलेश शर्मा व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. सदर महाआरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशन, पनवेल आणि पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या 40 पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून आलेल्या सर्व रुग्णांना विविध आरोग्य सेवा दिली. दीपक क्लीनिकल लॅबोरेटरी चे संचालक श्री.दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉईड चेकअपची सेवा देण्यात देण्यात आली जेणेकरून कोणत्याही भगिनींना जर थायरॉईड ची लक्षणे असतील तर वेळीच त्यांवर औषधोपचार सुरू करण्यास मदत मिळेल.
आर जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णांना मिळणार आहे. या शिबिरामध्ये आवश्यक ती रक्ततपासणी, जनरल बॉडी चेकअप आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला देण्यात आला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, पनवेल/उरण व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
:- डॉ.श्री.बाबासाहेब देशमुख, (आमदार,शेकाप)
महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत शेकाप आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांच्या कडून विविध आजारांचे निदान एकाच ठिकाणी रुग्णांना उपलब्ध करत आवश्यक त्या चाचण्या आणि औषधे मोफत देण्याचे नियोजन उत्तमरीत्या केले आहे. पक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारे विविध उपक्रम माझे सहकारी श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आम्ही राबवणार आहोत.
Be First to Comment