Press "Enter" to skip to content

महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गुजरातमधील सूरत येथून महाकुंभ मेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात असलेल्या ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनच्या बी६ कोचवर महाराष्ट्रातील जळगावजवळ दगडफेक करण्यात आली. महाकुंभ मेळ्यासारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. धार्मिक यात्रेकरूंवर होणार्‍या अशा हल्ल्यांना हिंदू समाज कदापी सहन करणार नाही. असाच भयंकर प्रकार वर्ष २००२ मध्ये राममंदिराची कारसेवा करण्यासाठी जाणार्‍या रामभक्तांबाबत गुजरातमधील ग्रोधा येथे घडला होता. तसेच अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रेवरही दगडफेकीच्या घटना घडतच आहेत. अशा धर्मांध समाजकंटकांवर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर आज रेल्वेगाडीवर दगड मारणारे उद्या रेल्वे गाडी जाळण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर काही धर्मांध मुसलमान हे ‘कुंभमेळा होऊ देणार नाही’, अशा धमकी देत आहेत. आता अशा प्रकारे रेल्वेवर दगडफेक करून त्यांनी प्रत्यक्ष कृती करायला सुरूवात केल्यासारखे दिसत आहे. कोट्यवधी हिंदू भाविकांच्या उपस्थितीत होणार्‍या कुंभमेळ्यात हिंदू संघटित होऊ नयेत आणि धर्माचरण करू नये, म्हणून हिंदूविरोधी शक्ती कार्यरत आहेत. दोषींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून त्यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, याचाही तपास व्हायला हवा. तसेच सामाजिक माध्यमांवर कुंभमेळा होऊ देणार नाही, म्हणणार्‍या धर्मांधांवरही शासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.