
“सुयश नारायण जाधव” भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील एक चमकता तारा
मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील
सोलापूर, महाराष्ट्राचा अभिमान असलेला सुयश नारायण जाधव हा भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील एक चमकता तारा आहे.
28 नोव्हेंबर 1993 रोजी जन्मलेल्या सुयशने जलतरणाच्या S7 श्रेणीत आपली आवड आणि मेहनतीने एक नवा टप्पा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याला भारताचा अभिमान तर आहेच पण करोडो लोकांसाठी प्रेरणाही आहे.
सुयशची कथा आपल्याला शिकवते की कितीही अडथळे आले तरी खरे समर्पण आणि आत्मविश्वास यशाचा मार्ग मोकळा करतो.आपल्या अपंगत्वावर मात करून मानाचा तुरा मिळवून तरूणाई स लाजवेल अशी कामगिरी फत्ते करून दाखवली खरच करावे तेवढे कौतुक कमीच आहे अभिमान वाटतो.तुझ्या कार्य,कौशल्यांचा अभिनंदन आणखीन मोठे यश मिळावे.
तर सलाम तुझ्या जिद्दीला…




Be First to Comment