
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “कचरा व्यवस्थापन आणि खारफुटी संवर्धन” या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी आजीवन अध्ययन व विस्तार विभागचे समन्वयक प्रो. (डॉ.) बी. एस.पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. प्रियंका जुन्दारे (पर्यावरण समन्वयक) आणि डॉ. श्रद्धा सावंत (क्षेत्रीय अधिकारी) यांनी सर्व विद्यार्थ्याना “कचरा व्यवस्थापन आणि खारफुटी संवर्धन” या विषयावर मार्गदर्शन केले.या कायर्क्रमात कचरा व्यवस्थापन ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि समुद्रातील वनस्पती, पक्षी, प्राणी इत्यादी घटकासाठी खारफुटी संवर्धनाची गरज याबाबत विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आजीवन अध्यन व विस्तार विभागाच्या एकूण ८६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील, आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रो.डॉ. बी.डी.आघाव, यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एच.एस खरात, (डॉ). के.बी.ढोरे, प्रा.अतुल घाडगे, प्रो. कुशल कुराणी, प्रा. पूनम शिंदे, अनुप्रिता वाठारकर, प्रा. स्नेहा आर. पारिंगे आणि प्रा. नेहा एस. पोरजी, प्रा.स्वेता व्ही. हुंबरवाडी, आणि प्रा. सागर व्यवहारे, यांनी अथक परिश्रम घेतले.




Be First to Comment