
उरण मधील प्रभात कोळी या स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनीधीत्व
इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही स्पर्धा इटलीतील मोलवेनो शहरात होणार असून उरण मधील प्रभात कोळी हा या स्पर्धेत देशाचे प्रतिनीधीत्व करणार आहे. याबद्दल त्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आज (दि. ३१) सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभातला पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते वसंतशेठ पाटील, राजू रघूनाथ कोळी उपस्थित होते.




Be First to Comment