
तृप्ती भोईर : उरण
दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी निलकमल हि प्रवासी बोट बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया कडून एलिफंटा च्या दिशेने जात असता नेव्ही च्या स्पीड बोटीने या बोटीला जोरदार धडक दिल्याने निलकमल बोटीच्या सोबत बोटीतील १५ पर्यटकांना जलसमाधी मिळाली होती.
१५ निष्पापांचे बळी घेतल्यानंतर नीलकमल बोट मंगळवारी घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर येऊन विसावली आहे.
१८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर जलसमाधी मिळालेली नीलकमल प्रवासी बोट तेरा दिवसांपासून समुद्राच्या गाळात ऋतून बसली होती. भाऊचा धक्का बुचदरम्यानच्या समुद्राच्या तळाशी रुतून बसलेल्या नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसह मालकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते.
समुद्राच्या तळाशी गेलेल्या १५ पर्यटकांसाठी मृत्यू बनून आलेल्या नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणण्यासाठी अवजड टगबोटींचाही वापर केला होता. टगबोटींच्या साहाय्याने टोइंग करून नीलकमल बोटीला घारापुरी बेटावरील राजबंदर किनाऱ्यावर आणून सोडण्यात आले . मोडकळीस आली असल्याने या बोटीला किनाऱ्यावरील कोरड्या जागेत आणण्यासाठी मोठे प्रयास पडले.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास नीलकमल बोटीला किनाऱ्यावर आणले आहे. आता या बोटीची विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणार करणार असल्याचे सांगितले जात आहे. तपासणीनंतरच बोट नेमक्या कोणत्या कारणाने बुडाले याचा उलगडा होणार आहे.




Be First to Comment