
तृप्ती भोईर : उरण
रयत शिक्षण संस्थेचे द्रोणागिरी हायस्कूल मराठी व सेमी इंग्रजी माध्यम करंजा, तालुका उरण शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक ३०डिसें २०२४ रोजी दुपारी तीन वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहाने व दिमाखात संपन्न झाले.
या सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष मा. श्री प्रदीप बाळू नाखवा साहेब (चेअरमन करंजा मच्छीमार सोसायटी) तसेच कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थिती मान. श्री अजय गोविंद म्हात्रे (सरपंच , ग्रुप ग्रामपंचायत चाणजे )मा.श्री राजेंद्र जयदास नाखवा (व्हाईस चेअरमन करंजा मच्छिमार सोसायटी) ,मा.श्री. सिताराम नाखवा (चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समिती) तसेच सर्व सदस्य मा. हर्षद सखाराम नाखवा ,मा.मनोहर कोळी (नवापाडा गाव अध्यक्ष) , मा.श्री.चंद्रकांत गोविंद कोळी, मा. श्री. के. एल. कोळी, मा. श्री . देविदास थळी, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य,माता पालक संघाचे सर्व सदस्य,आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमास प्रारंभ झाला.
सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री सरस्वती देवीचे पूजन व दीप प्रज्वलन करून मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत आपल्या सुरेल आवाजात गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थितांचा यथोचित सत्कार शाल व बुके देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ सुरेखा चंद्रशेखर म्हात्रे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये आर्थिक व वस्तूरूपाने देणगी देणाऱ्या संस्था व व्यक्तींचे कोड कौतुक करण्यात आले.यानंतर अध्यक्षीय भाषणात मा. प्रदीप नाखवा यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. आलेल्या
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना कौतुकाची थाप दिली.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविले त्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट ट्रॉफी व मेडल देउन गुणगौरव करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. लोककलेतून भक्तीगीते, गोंधळ, कोळी गीते, लग्न गीते, नाटिका सोलो डान्स, हिंदी व मराठी रिमिक्स गीते इत्यादी विषयांवरील सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रत्येक नृत्याला प्रेक्षकांनीही टाळ्यांची दाद दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. बी. म्हात्रे सरांनी तर आभार सौ. एस.ए.दिवेकर मॅडम यांनी मांडले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे होण्यासाठी, कार्यक्रम बहारदार होण्यासाठी श्री. डी.डी.जोशी सर यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा म्हात्रे मॅडम, तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा समिती सदस्य, विद्यार्थी, पालक वर्ग यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमावेळी आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Be First to Comment