
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या विविध शाळांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच विविधि स्पर्धां तसेच परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खांदाकॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या सभेला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, कृष्णा ठाकूर, सचिव एस.टी. गडदे, संचालक संजय भगत, वर्षा ठाकूर, वसंत पाटील, जगदीश घरत, हरीशचंद्र पाटील, अमोघ ठाकूर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.




Be First to Comment