
उघड्यावर विकला जाणारा चिकन शोरमा खाल्याने ५ मुलांना विषबाधा
तृप्ती भोईर : उरण
उरण तालुक्यातील दिघोडे बस स्थानका जवळील उघड्यावर विकला जाणारा चिकन खाद्यपदार्थ शोरमा मूलांनी खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी दि २८ रोजी हि घटना घडली आहे.शोरमा खाल्लेल्या मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मूलांवर उपचार सुरू केले.सदरची विष बाधा ही शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने झाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
उरण तालुक्यातीलअन्न व औषध प्रशासन काय करत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरीक विक्री करत आहेत.त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या,पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत.त्यातच शनिवारी दि२८ दिघोडे बस स्थानका जवळील रस्त्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील,शुभम ठाकूर,निशांत भगत,रोहन पाटील व आणखीन एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयातील डॉ प्रकाश मेहता यांनी सदर रुग्णांवर उपचार सुरू केले.परंतु आज डॉ प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहे.तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या आरोग्याशी खेळत आहे का ? प्रश्न नागरिकांना पडला आहे




Be First to Comment