
तृप्ती भोईर : उरण
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा
मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या श्रीगणेशा खोदाई सुरू करण्यात आला आहे. परंतू खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत आहे .
राज्य सरकारने या ठिकाणी कांस्य धातूचा साठ फूट उंचीचा, ८ मिलिमीटर जाडीचा पुतळा उभारण्याचे काम सुरू केले आहे. पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा करायचा आहे तो चौथरा ३ मिटर उंचीचा मजबूत असा असेल. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्यासाठी अट घातली आहे.
जेष्ठ शिल्पकार राम सुतार त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने याआधी गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते देशाभरात मोठे पुतळे त्यांनी आपले कौशल्य वापरून दर्जेदार बनविण्यासाठी ते अनुभवी आहेत. त्यांना राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना अभियांत्रिकी बांधकाम उभारणी, संचलन, देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती इतर निविदांची मानाने राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले.
अगोदर तीन फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाईल .नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी मुंबई आणि अनुभवी कंत्रांडर कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा यासाठी तज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.याकरिता खोदाई चे काम काळजीपूर्वक आणि सावधगिरी बाळगून केले जात आहे.




Be First to Comment