तृप्ती भोईर : उरण
उरण शहर म्हणजे दिवसागणिक काही ना काही भयावह घडत आहे दोन दिवसांपूर्वी भर बाजारपेठेत गॅस दुरस्ती दुकानात सिलिंडर ने पेट घेतला होता, त्यापुर्वी गोदाम, भंगाराच्या दुकानांना इतकेच काय तर चालत्या वहानाला हि आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
दिनांक २६ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळी उरण शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. सदरची आग घरात स्वयंपाक करीत असताना गॅसच्या ओट्याजवळ असलेल्या खिडकीवरील कपड्याने पेट घेतल्यामुळे आग लागल्याची माहिती प्राथमिक सुत्रांकडून मिळत आहे. तसेच आग लागलेल्या रहिवाशांच्या इमारतीत पारसिक बँक असल्याने बँकेत आलेल्या ग्राहकांची व रहिवाशांची एकच धावपळ उडाली सदरच्या आगीत कोणालाही दुखापत झाले नसल्याचे समजत आहे या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
Be First to Comment