तृप्ती भोईर : उरण
रेशन दुकानात चालणाऱ्या गैर व्यवहाराला, फसवणुकीला आता लगाम बसणार ,याशिवाय रेशन आले का?आहे का? हे पहायला रेशन दुकानात जावे लागणार नाही तर दुकानात जेव्हा तुमचे रेशन येईल असा मेसेज आता तुम्हाला घरबसल्या मिळेल. त्याचप्रमाणे आपण रेशन घेतल्यावरही तसा मेसेज आपल्या मोबाईल वर मिळेल. याशिवाय आपल्या हक्काचे रेशन दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने उचलल्यास तसाही मेसेज आपल्या मोबाईलवर येणार.
यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे शिधापत्रिकेशी आधार कार्ड जोडणी, मोबाईल क्रमांक जोडणी आवश्यक आहे.
लाभार्थ्यांच्या धान्याचा काळाबाजार होऊ नये ह्याच्या वाड्याचे धान्य त्याच्या वाट्यास जाऊ नये म्हणून राज्य शासनाच्या पुरवठा विभागात आता आधुनिक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना आपल्या रेशन दुकानावर धान्य आले का? याची माहिती त्यांच्या मोबाईलवर कळते. यासाठी मोबाईल क्रमांक त्यांच्या रेशन कार्ड सोबत संलग्न करावा लागणार आहे. आणि पनवेल तालुक्यातील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक रेशन कार्ड सोबत संलग्न करण्याचे काम सुरूही झाले आहे.
मोबाईल नंबर शिधापत्रिकेशी संलग्न असेल तर रेशन दुकानावर धान्य आल्यानंतर त्याची माहिती थेट मोबाईलवर मेसेज द्वारे कळणार आहे याकरिता लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करणे गरजेचे आहे. याचा फायदा कार्डाद्वारे गहू आणि तांदूळ नेमका किती घेतला? ही माहिती देखील मोबाईलवर तात्काळ कळणार असल्याने गैरप्रकार थांबणे शक्य होणार आहे.
कार्डधारकांनी दुकानातून रेशन घेताच त्याचा मेसेज लिंक केलेल्या मोबाईलवर धडकणार असल्यामुळे आपल्या कार्डवर कोणी दुसऱ्याने रेशन घेतल्यास ते तात्काळ कळणार आहे.
शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा अथवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून मोबाईल क्रमांक जोडणी साठी अर्ज करावा. प्रत्येक कार्डधारकांनी आपला मोबाईल लिंक करावा यासाठी पुरवठा विभाग तसेच रेशन दुकानदारांकडून जनजागृती केली जात आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडून मोबाईल क्रमांक रेशन कार्ड सोबत संलग्न करण्याचे काम सुरू आहे.
“धान्य वितरण प्रणाली पूर्णतः पारदर्शक करण्याचे सर्वकष प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिधावाटप प्रणालीशी नागरिकांचे मोबाईल क्रमांक जोडले जात आहे लाभार्थ्याने ही प्रक्रिया विना विलंब पूर्ण करावी .”
(अश्विनी धनवे ,रेशन पुरवठा अधिकारी पनवेल)
Be First to Comment