
धावणे, पोहणे आदी विविध क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी मिळविले यश ; तालुका क्रिडा अधिकाऱ्यांसह मुंबईच्या महिला पोलिसांची प्रमुख उपस्थिती
अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पीएनपी सायरस पुनावाला सीबीएसई शाळेमध्ये सोमवारी सायंकाळी वार्षिक क्रिडा स्पर्धांचे तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, पोहणे, फुटबॉल अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टींग चॅम्पीयन तथा तालुका क्रिडा अधिकारी अंकिता मयेकर, आंतरराष्ट्रीय धावपट्टू तथा मुंबईच्या महिला पोलीस, पीएनपी कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी सोनिया मोकल, माजी सरपंच नंदकूमार मयेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका गितीका भूचर, उपमुख्याध्यापिका बर्टीना मेलीट, क्रीडा प्रशिक्षक राकेश म्हात्रे, संस्थेचे मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला पोहण्याची स्पर्धा शाळेच्या अद्ययावत अशा स्विमिंग पूलमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फुटबॉल, चमचा गोटी, धावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
50 मीटर धावणे मुलांच्या गटात आरुश याने प्रथम क्रमांक पटकाविला असून श्रीनिवास बनकर याने द्वीतीय व स्वरुप घाडगे याने तृतीय क्रमांक मिळविला. 50 मीटर धावणे मुलींच्या गटात समंथा नायडू हीने प्रथम, प्रिशा राऊत द्वीतीय व नाव्या गुप्ता हीने तृतीय क्रमांक मिळविला.
बॉल ईन बकेट स्पर्धेत नाव्या गुप्ता हीने प्रथम, समंथा नायडू हीने द्वितीय तर क्रिस्टिना मेलिट हीने तृतीय क्रमांक मिळविला. पोहण्याच्या स्पर्धा विविध गटात पार पडल्या त्यामध्ये पहिल्या गटात (मुली) प्रिशा राऊळ हीने प्रथम समंथा नायडू हीने द्वीतीय व नाव्या गुप्ता हीने तृतीय क्रमांक पटकाविला.
मुलांच्या गटात अंश निखिल मयेकर याने प्रथम, शुभ अनंत सिंग याने द्वितीय, तर वंश केतन पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. पोहण्याच्या स्पर्धेत गट क्रमांक दोनमध्ये मुलींमध्ये विश्वा कांबळी, त्विशा प्रधान काश्वी बुरांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतीय व तृतीय क्रमांक मिळविला. मुलांमध्ये अर्णव मगर, अथर्व घरत, श्रीमत म्हात्रे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतीय व तृतीय क्रमांक मिळविला. पोहण्याच्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या गटात मुलींमध्ये आर्या भोईर याने प्रथम, काव्या भगत हीने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलांमध्ये रुद्र नाखवा याने प्रथम, आर्यन पाटील याने द्वितीय, शंतनू कवळे याने तृतीय क्रमांक मिळविला. फुटबॉल, बास्केट बॉल व लंगडी स्पर्धेत ही यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.






Be First to Comment