Press "Enter" to skip to content

डॉ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे स्वच्छता अभियान

अलिबाग ते रेवदंडा ६८किमी रस्ता सफाई : ४४ टन कचरा गोळा

अलिबाग – (धनंजय कवठेकर)

अलिबाग स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबवून लोकांना विविध सेवा मिळवून देण्याचे सामाजिक कार्य डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे केले जाते. आरोग्य, स्वच्छता बरोबरच स्मशानभूमि स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून, त्यासोबत मुस्लिम समाजातील कब्रस्थानांची स्वच्छता करुन मानवता धर्माचे जतन करण्यात आले आहे.

समाजातातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे महत्व कळावे व त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने भारत देशाचे स्वच्छता दूत, पयत्री, महाष्ट्र‌भूषण डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यांतील रेवदंडा ते अलिबाग मुख्य रस्त्याचे दुतर्फा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आज झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये १२२४ श्रीसदरयांनी एकूण ६८.२० किमी रस्ता स्वच्छ केला असून, त्यातून ४३.९८० टन कचरा गोळा करण्यांत आला व त्याची योग्य विल्हेवाट लावणेत आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.