पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज खांदा कॉलनी नवीन पनवेल (स्वायत्त) येथे महाविद्यालयाच्या कर्मचारी अकादमी आणि कल्याण समिती व माधवबाग आणि प्रजापती ग्रुप फौंडेशन यांच्या समन्वयाने आज (दि. २१) महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माधवबागच्या डॉ. सुनिता पाटील, श्रुती मावळे, शारदा गुंजाळ, रक्षंदा काकडे व प्रजापती फौंडेशनच्या डॉ. यशस्वी चौधरी, डॉ. पूजा बरघारे, डॉ. विश्वजित पाटील व पल्लवी निंबाळकर यांची उपस्थित लाभली.शिबिरामध्ये सी. बि. सी. , कोलेस्ट्रोल, रक्तशर्करा तपासणी, दंतचिकित्सा आणि थायरॉईड या निदान चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ एकूण ९२ महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.
Be First to Comment