
अलिबाग जिल्हा रूग्णालयाजवळ उभी आहे बेकायदेशीर अवाढव्य होर्डींग
अलिबाग – (धनंजय कवठेकर)
शहरातील जिल्हा रूग्णालयाजवळ 60 फुटी होर्डींग निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी लावण्यात आली होती. आचारसंहिता सुरू झाल्यावर या होडींगवरील बॅनर प्रशासनामार्फत हटविण्यांत आला. परंतु 60 फुटी लोखंडी होर्डींग मात्र तशीच ठेवण्यांत आली. दोन महिने झाले तरी ही होर्डींग तशीच उभी आहे. अलिबागमधील अनेक नागरिकांनी समाजमाध्यमांवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे शहरप्रमुख समीर मधुकर ठाकूर यांनी नगरपरिषद कर्मचा-यांना सदरची होर्डींग धोकादाय असल्याने तात्काळ काढून टाकण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरीही सदरची होर्डींग तशीच उभी असून नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
अशास प्रकारच्या अवाढव्य होर्डींग कोसळल्यामुळे गेल्या मे महि-यात घाटकोपर येथे 16 नागरिकांचा हकनाक बळी गेला असल्याची बाब अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी लक्षात आणून दिली आहे. सावंत यांनी नगरपालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याकडे या होर्डींगसंदर्भात परवानगी मागणारा अर्ज आला नसल्याचे सांगितले आहे. अलिबाग नगरपालिका प्रशासकांचा कारभार सध्या मुरूड नगरपालिकेच्या प्रशासकांकडे आहे. नगरपालिका प्रशासनाने सदरचे होर्डींग सबंधीत कंत्राटदाराकडून त्वरीत काढून टाकावे व बेकायदा होर्डींक लावल्या प्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.





Be First to Comment