Press "Enter" to skip to content

२०२५ ची नवीन कार्यकारिणी जाहीर

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम

पनवेल(प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सन २०२५ सालाकरिता कार्यकारिणीची निवड बिनविरोध जाहीर झाली. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी, विवेक पाटील आणि संजय सोनावणे मंचाचे सल्लागार असणार आहेत. सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, खजिनदारपदी संजय कदम, कार्यकारिणी सदस्य म्हणून नितीन कोळी, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, दत्ता कुलकर्णी, भरतकुमार कांबळे हे जबाबदारी पार पाडणार आहेत.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या १९ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून फक्त पत्रकारिता नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे.दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टर संच देण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे. कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप, अशी व इतर उपक्रमे वर्षभरात होत असतात. समाज हिताचे कार्य करण्यात पनवेल तालुका पत्रकार विकास मंच नेहमीच अग्रणी राहिले आहे. मंचाने दुर्गम भागातही कार्य पोहोचवले आहे. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम ठेवण्यासाठी यापुढेही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचे मंदार दोंदे यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.