Press "Enter" to skip to content

सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा 

महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ दुसऱ्या क्रमांकावर 

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने 2 आणि 3 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली होती. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने (नॅक) महाविद्यालयास 3.52 सी.जी.पी.ए. सह ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन शुक्रवारी प्रदान केले आहे. या अभुतपूर्व यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांपैकी सीकेटी महाविद्यालय क्रमांक दोनचे महाविद्यालय बनले आहे.

अवघ्या अडीज दशकांहून काही अधिक कालावधीत महाविद्यालयाने पहिल्या दोन फेरीत अ श्रेणी, तिसर्या फेरीत अ+ श्रेणी आणि चौथ्या फेरीत अ++ श्रेणी प्राप्त करत शैक्षणिक क्षेत्रातील आपले धुरिणत्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

या देदीप्यमान यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर , संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिवडॉ. एस.टी.गडदे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे.

राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणार्या शैक्षणिक संस्थानांचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीपेक्ष्य, अध्ययन-अध्यापन प्रणाली, विस्तारकार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मुल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते. याच धर्तीवर सीकेटी कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने भेट दिली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यापासून नॅक मुल्यांकनाचा विषय प्राधान्यक्रमाने हाती घेतला होता. या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रोफेसर डॉ. बी. डी. आघाव यासोबतच कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे प्रमुख, सर्व विभाग आणि समित्यांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

या शैक्षणिक मूल्यमापन भेटी दरम्यान नॅक पिअर टीमचे चेअरमन कलिंगा विद्यापीठ, रायपुर, छत्तीसगड कुलगुरू डॉ. आर. श्रीधर, समन्वयक सदस्य म्हणून सरदार पटेल विद्यापीठ, गुजरातच्या जैविक विज्ञान (बायोसायन्स) विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. कमलेशकुमार पटेल व सदस्य म्हणून यमुनानगर हरियाणा येथील गुरुनानक गर्ल्स कॉलेजच्या संचालिका डॉ. वरिंदर गांधी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभाग, ग्रंथालय, मेकर स्पेस, परीक्षा विभाग, विद्यार्थी परिषद व कल्याण कक्ष, महिला विकास कक्ष, सी.डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भाषा प्रयोगशाळा, रेशीम संशोधन केंद्र, मशरूम रोपण केंद्र, विस्तार विभाग- राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोअर, जिमखाना, प्रशासकीय कार्यालय तथा महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची पाहणी केली.

नॅक पीअर टीमने महाविद्यालयाचे शैक्षणिक परिपेक्ष्य (Criterion I- Curriculum Aspects), अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन प्रणाली (Criterion II- Teaching, Learning and Evaluation), संशोधन, नवकल्पना आणि विस्तार (Criterion III- Research, Innovation and Extension), पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि अध्ययन साधनसामग्री (Criterion IV- Infrastructure and Learning Resources), विद्यार्थी प्रगती आणि विविध उपक्रम (Criterion V- Student Support and Progression), व्यवस्थापन आणि संघटन (Criterion VI- Governance, Leadership and Management), संस्थानात्मक मूल्ये आणि सर्वोत्कृष्ट कार्यशैली (Criterion VII- Institutional Values and Best Practices) अश्या 07  निकषांच्या आधारे मूल्यमापन केले यासोबतच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, यांच्यासोबत संवाद साधला व आपला लेखी अहवाल नॅक पोर्टलवर जमा केला.

सर्व पाहणी संपन्न झाल्यानंतर समारोप बैठकीमध्ये नॅक पिअर टीमचे चेअरमन कलिंगा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर. श्रीधर यांनी उपस्थितांना संबोधित करताना नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक सर्व घटकांची नियोजनबद्धपूर्ण तयारी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे तथा महाविद्यालयाच्या उत्कर्षामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांच्या बाबत गौरवोद्गार काढले. तथा त्यांच्या कार्यकाळातील भेट दिलेल्या सर्व महाविद्यालयांपैकी सीकेटी महाविद्यालय क्रमांक 1 चे महाविद्यालय असल्याचे प्रतिपादन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.