खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा यांच्या वतीने रवि.दि.१५ डिसेंबर रोजी वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्व.मा.आ.पां.रा.सानप कुणबी भवन रोहा(मेहेंदळे हायस्कूलच्या पाठीमागे) येथे स.१० ते दु.२ पर्यन्त संपन्न होणाऱा हा मेळावा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी समाज बांधवांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून मागील काही वर्षांपासून या मेळाव्याला मिळणारे यश पाहता या ही वर्षी देखील आयोजित मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
या मेळाव्यात सहभाग घेणाऱ्यांना मुलांना २५०/- रू.फी आकारण्यात आली आहे.तर मुलींसाठी कोणत्याही प्रकारची फी घेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.तर मेळाव्याचे अधिक माहितीसाठी रामचंद्र सकपाल ९३०७६९४२०८,अनंत थिटे ९९७०३९१६१२,
सतिश भगत ७७९८५१२६२६,सुहास खरिवले ९६६५१६९६६६ ,दिपिका भगत ९२७२७४७४६३,शिल्पा मरवडे ७६२०७०६१२४
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Be First to Comment