पनवेल (प्रतिनिधी) खते आणि रासायनिक उद्योगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) कंपनीने तळोजा येथे नव्याने सुरू झालेल्या अमोनिया उत्पादन प्रकल्पात प्रगत शून्य सांडपाणी विसर्ग (झिरोलिक्विडडिस्चार्ज -झेडएलडी) प्रणालीचा समावेश करून शाश्वत उत्पादन निर्मितीमध्ये आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे.
एकात्मिक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट(ईटीपी) आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रक्रिया परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेड मधील ही अत्याधुनिक झेडएलडी प्रणाली पर्यावरणीय व्यवस्थापनात एक गुणवत्तेचा मापदंड स्थापित केला आहे. दर तासी २५ घनमीटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेली झेडएलडी प्रणाली प्रक्रिया केलेल्या पाण्याचा संपूर्ण पुनर्वापर सुनिश्चित करते, ज्यामुळे प्रकल्पातून शून्य सांडपाणी विसर्ग हा उद्देश साध्य होतो. दररोज ३,०७७ घनमीटर इतके प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रभावीपणे पुनर्वापर करून कूलिंग टॉवरमध्ये वापरले जाते. त्यामुळे वर्षभरात एकूण ११ लाख २३ हजार १०५ घनमीटर पाण्याची बचत होत असल्याने वर्षभरात नवी मुंबईतील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. या विषयावर आपले मत व्यक्त करताना श्रीमुकुल अग्रवाल(प्रेसिडेंट-मॅन्युफॅक्चरिंग) यांनी सांगितले की, ‘दीपक फर्टिलायझर्समध्ये शाश्वतताही केवळ बांधिलकी नाही; तर हे आमच्या कार्यप्रणालीच्या आचरणाचा अंतर्भूत भाग आहे. त्याचप्रमाणे आधुनिक झेडएलडी प्रणालीचा वापर हा आमची उत्पादन कार्यक्षमता वाढविताना पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
झेडएलडी प्रणाली ईटीपी आणि आरओ प्रक्रियेच्या सहकार्याने औद्योगिक सांडपाण्यातून पाणी पुनर्प्राप्तकरण्यासाठी आणि पुनर्वापर करण्यासाठी कार्य करते. पारंपारिक झेडएलडी पद्धतींच्या तुलनेत पाण्याच्या पुनर्वापरासाठी विजेचा वापर लक्षणीयरित्या कमी करून ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान झेडएलडी प्रणालीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. शिवाय कोणतेही सांडपाणी पर्यावरणात सोडले जाणार नाही, याची काळजी घेऊन हा उपक्रम केवळ जलसंधारण न करता सोबत ताज्या पाण्याची गरज कमी करून, कडक नियामक निकषांची पूर्तता सुद्धा करत आहे. “झेडएलडी तंत्रज्ञानातील सुरुवातीची भांडवली गुंतवणूक जास्त असली, तरी पाण्याचा वापर कमी करून दीर्घकालीन बचत करता येऊ शकते,”असे अग्रवाल यांनी सांगितले. हे यश दीपक फर्टिलायझर्सच्या शाश्वत उत्पादन पद्धतींच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि शाश्वत औद्योगिक वाढीच्या जागतिक उद्दिष्टात योगदान देताना नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या उद्देशाला बळकटी देणारे आहे. त्यामुळे अमोनिया उत्पादन प्रकल्पात प्रगत शून्य सांडपाणी विसर्ग प्रणालीला अनन्य साधारण महत्व आहे.
Be First to Comment