Press "Enter" to skip to content

करंजाडे हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी महेंद्रशेठ घरत यांची पाच लाखांची देणगी !!

पनवेल तालुक्यातील करंजाडे गावातील एकमेव हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा घाट ग्रामस्थ मंडळाने घातला आहे.  यासाठी त्यांनी सर्वच दानशूर व राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या व मंदिराच्या जीर्णोधारासाठी सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन केले.यानुसार त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे दानशूर नेते महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन दिनांक २१ नोव्हेंबर रोजी जीर्णोद्धार सोहळा होत आहे तरी आपण उपस्थित राहावे हि विनंती केली. महेंद्रजी घरत यांनी जीर्णोद्धार समारंभासाठी उपस्थित राहून ५ लाख रुपयांची देणगी त्याचक्षणी जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्द केली.

      यावेळी उपस्थित ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले करंजाडे गावावर विशेष प्रेम केल्याची आठवण केली.रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून १९९७ ते २००२ या काळात करंजाडे गावासाठी  पाण्याचा जलकुंभ उभारून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम आपण २५ वर्षांपूर्वी केले होते याचा विसर गावाला पडलेला नाही. करंजाडे गावाच्या विकासासाठी मंदिर, शाळा इमारत, तलाव शुशो भिकरण,गावातील रस्त्याचे कॉक्रिटीकरण आदि कामासाठी भरघोस निधी  महेंद्रशेठ घरत यांनी उपलब्ध करून दिला होता.त्यामुळे करंजाडे ग्रामपंचायतीला आदर्श   ग्रामपंचायत पुरस्कार २००१ मधे जाहीर झाला होता या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिला.

गेल्या 35-36वर्षात महेंद्रजी घरत यांनी विकासकामांचा डोंगर उभारलेला आहे आजही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या उक्तीप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी,विकासासाठी अहोरात्र झटणारा नेता,आमदार नाही,खासदार नाही मात्र विकास कार्यात, समाज कार्यात आणि दानधर्मासाठी,कला -क्रीडा, धार्मिक कार्यासाठी समाजामध्ये आधारस्तंभ   म्हणून आपला ठसा उमटवीला आहे. निवडणुका झाल्या उमेदवार दिसेनासे झाले परंतु जनसेवेसाठी ठाम उभा   असणारा नेता म्हणून महेंद्रजी घरत गोरगरीबांसाठी सदैव तत्पर असतात.त्यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.