सेवानिवृत्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री राजेंद्र पावसकर.
पनवेल - आजची सध्याची स्थिती व आपल्या जीवनामध्ये असणारे ताण तणाव यामुळे अनेक प्रसंग पाहता त्याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने शारीरिक मानसिक बळ वाढवणे आवश्यक आहे. हा उद्देश लक्षात घेऊन सनातन संस्था सातारा या न्यासाच्या वतीने व निवृत्त सेवक मंडळाच्या सहकार्याने पनवेल येथे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी तणाव विरहित जीवन कसे जगावे या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
श्री राजेंद्र पावसकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले मार्गदर्शना मध्ये जीवनात तणावमुक्त जीवन जगायचे असेल तर आपण अपेक्षा विरहित जीवन जगायला हवे, इतरांचे गुण पाहिल्याने आपणाला आनंदी जीवन जगता येईल. प्रत्येक व्यवहार समभावाने करायला हवा. सतत वर्तमानातं राहावं असे सांगितले.
श्री राजेंद्र पावसकर पुढे म्हणाले, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ध्यानामुळे मन सक्षम होऊ शकते. नामस्मरण करणे ही कलियुगातील एकमेव साधना आहे. नामस्मरण केल्याने मन सशक्त होते, तसेच मानसिक ताण न्यून होतो.
अभिप्राय :
श्री. हरिश्चंद्र भगत सर म्हणाले की खूप छान शिकायला मिळाले.
जीवनत आनंद मिळवायचा असेल
तर इतरांकडून अपेक्षा कमी ठेवायला पाहिजे हे लक्षात आले.
श्रीमती सुनंदा पाटील – आपण अहं कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यास आनंद मिळेल हे लक्षात आले. मार्गदर्शन छान
झाले
Be First to Comment