Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विकासपुरुष- केंद्रीय मंत्री सुरेश गोपी 

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या ५ वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय नैसर्गिक वायु, पर्यटन आणि पेट्रोलियम राज्य मंत्री सुरेश गोपी यांनी नवीन पनवेल येथे केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.        

पनवेल मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार संपुर्ण मतदार संघात झाला. प्रत्येक ठिकाणी त्यांना मतदारांचा आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद लाभला तसेच माता भगिनींनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. या सभेत बोलताना नामदार सुरेश गोपी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच येत्या ५ वर्षात पनवेलचा अधिक वेगाने विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून निवडून आणावे लागणार आहे. त्यामुळे पनवेल मतदारसंघात राहणाऱ्या सर्व मल्ल्याळी आणि दक्षिण भारतीय बांधवांनी आपले मत हे आमदार प्रशांत ठाकूर यांनाच नक्कीच द्या, असे आवाहन केले. 

नामदार सुरेश गोपी यांनी पुढे बोलताना सांगितले कि, भाजप आणि सहकारी पक्षाची विचारधारा सामाजिक विकासाची आहे. त्या अनुषंगाने देशात आणि राज्यात काम होत आहे. कितीही कामे केली तरी विरोधक फक्त समाजात विरोधच पसरवत असतात. त्यामुळे त्यांची मानसिकता हि देशहिताची कधीच राहिली नाही. आपण काम करत रहायचे हा आपल्या सर्वांचा उद्दिष्ट आहे, आणि त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर काम करत असतात, त्यामुळेच सर्व समाजातील लोकं त्यांच्याशी जोडली गेली आहेत. शुद्ध विचाराने काम करत असल्याने त्यांना जनतेचा पाठिंबाही मिळत आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम होत आहे. आणि त्याच अनुषंगाने देशात मोठ्या प्रमाणात झपाट्याने विकास होत आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.      

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, युटर्न घेत सर्वच विकास कामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात केले. राज्याच्या विकासापेक्षा त्यांनी स्वतःच्या विकासालाच प्राधान्य दिले. त्यामुळे जनतेला विकासाच्या दिशेने नेऊन त्यांच्या नेहमी पाठिशी असणाऱ्या महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणा तसेच येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन केले. या सभेला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, भाजप दक्षिण भारतीय सेलचे महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक रमेश नायर, उत्तर रायगड जिल्हा सह संयोजक जयेश नांबियार, महिला मोर्चा उपाध्यक्षा यमुना प्रकाशन, सुषमा नायर, लीना प्रेमचंद, माया नायर, विद्या श्रीकुमार, जय प्रकाश, रामकृष्णन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.