उरण : तरुणांच्या गळ्यातील ताईत प्रीतमदादा म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नुकताच उरण येथील जाहीर सभेदिवशी भाजपच्या माजी सभापती निकिता भोईर, नित्यानंद भोईर, रत्नमाला म्हात्रे, प्रकाश कडू, गोविंद सुतार, मुकेश थळी, प्रणित ठाकूर, राहुल पाटील यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे. तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकत्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने आम आदमी पार्टी उरण विभाग अध्यक्ष विवेक लक्ष्मण पयेर (विभागध्यक्ष आम आदमी पार्टी उरण ), जयेश पाटील, हरेश पयेर, भावेश पाटील, सम्राट सवंगडे, दिवेश ठाकूर, अनिल पाटील, चेतन जाधव, हर्षद पाटील, पप्पू कुरेशी, आसिफ कुरेशी, अर्शद सिद्धिकी, मोहम्मद तफसीर, शादाब पठाण, भाविक कोळी, कुशल गुप्ता, गणेश भाकरे, गणेश केदार, सूरज रामेश्वरी, निशांत गायकवाड, रजनीश यादव, सुरज वाल्मिकी, रुपाबिराजदार, साई गाडे, देवेंद्र पाटील, अजय ख्याळे, दिपेश सूरवसे, यश ठाकूर, कुणाल ढेमबरे, रोशन पोल, शुभम माळी, निलेश म्हात्रे, ओम चौधरी आकांशा झिने, अनिकेत झीने, प्रणित ठाकुर, राहुल पाटील, मयूर, तांडेल, साईराज पाटील, रितेश पाटील, प्रेम पवार, विरक्त चाळके, सुनील पाटील, अभिजीत पाटील, साईनाथ पाटील या सर्वांचे शेकाप पक्षात स्वागत करताना प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि तुम्ही काही माझ्यासाठी मेहनत घेणार ती मेहनत वाया जाऊ देणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, एल बी पाटील, तालुका चिटणीस विकास नाईक, गायक सम्राट आनंद शिंदे, वामन तांडेल ,रवी घरत, रमाकांत पाटील ,जासई सरपंच संतोष घरत, शहर चिटणीस शेखर पाटील, रमाकांत म्हात्रे, सचिन ताडफळे, नित्यानंद भोईर, सिताराम नाखवा आदि मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment