Press "Enter" to skip to content

कोरोना काळात प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केलेली मदत जनता विसरणार नाही

उरण : कोरोना काळात जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केलेली मदत पनवेल उरण, खालापूर विधानसभा हद्दीतील नागरिक जनता कधीच विसरणार नाही. गोरगरीब नागरिक तसेच गरजू नागरिकांचा विचार करणारे महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात येत आहे. 

        दोन चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे लॉक डाऊन परिस्थितीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्रीतम जे एम म्हात्रे यांनी अनेकांना सर्वतोपरी मदत केली. कोरोना महामारीने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रीतम जे एम म्हात्रे यांनी या संकटकालीन परिस्थितीत हजारो नागरिकांना मदत केली. यावेळी किराणा वस्तूंचे कीट, रुग्णालय व्यवस्था यासह सर्वतोपरी मदत करण्यात आली. प्रीतमदादामधून माणुसकी चे दर्शन यावेळी अनेकांना दिसून आले. दरम्यान प्रीतम जे एम म्हात्रे यांना देखील कोरोना झाला होता. मात्र ते यात डगमगले नाहीत. त्यांनी आपली सेवा सुरूच ठेवली.

    कोरोनाच्या काळात हजारो अन्य धान्याचे कीट, अन्नधान्य वाटप, मास्क, सॅनिटायझर, औषधे आदी वाटप केली. तसेच अनेक शिबिरे देखील भरवली. हजारोंना आर्थिक मदत देखील केली. करोना काळात अनेक नागरिकांना दिलासा देण्याचे काम जे एम म्हात्रे चारिटेबल संस्थेच्या वतीने प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केले. प्रीतम जे एम म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबांची भेट घेत त्यांना मोठा धीर दिला होता. हे येथील जनतेने पाहिले आहे. अनेक तळागाळात झोपडपट्टीपर्यंत मदत पोहोचवली. ज्या ठिकाणी कोणीही पोहोचले नाही त्या ठिकाणी प्रीतम म्हात्रे मदत घेऊन पोहोचले होते. प्रीतम जे एम म्हात्रे अनेकांच्या मदतीला सामाजिक बांधिलकीने धावून जात असतात. त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे आणि प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने हक्काचा माणूस उरण विधान सभेतून निवडून येणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.