स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ६८ वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२४-२५ उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे उत्पन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोल्डन गर्ल कु क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पदकाची कमाई करत राष्ट्रिय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले आहे.
कु क्षितिजा मरागजे हीने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक जिंकून विक्रम केला आहे. त्याच सोबत राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत तिने कांस्य पदकाची कमाई करून नव्या विक्रमाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. कु. क्षितिजा ही कारमेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विध्यार्थीनी असून, राजाराम कुंभार संचलित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीची मल्ल आहे येथे तिला महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पलांडे, विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या ती राष्ट्रिय खेल प्राधिकरण – मुंबई येथे द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकारा, अमोल यादव, शिल्पी नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सराव करत आहे.
कु. क्षितिजा ही कोयना समाजातील वडवळ – खालापूर येथील कुसावडे गावची रहिवाशी असून ती वयाच्या आठव्या वर्षा पासून कुस्तीचा सराव करत आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या क्षितिजाने भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याचा मनोदय ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment