Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यात शेकाप आणि उबाठा गटाला मोठा हादरा

चिखले ग्रामपंचायतीचे सदस्य समर्थकांसह भाजपात

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आज (दि. १७) जाहीर पक्ष प्रवेश केला. यासर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि उबाठा गटाला मोठा हादरा बसला आहे. 

        या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी सरपंच नामदेव पाटील, हिरामण पाटील, माजी सदस्य रमेश गडकरी, बुथ अध्यक्ष राम फडके, योगेश पाटील, भालचंद्र पाटील. संजय शेळके, निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
       
पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शेकाप आणि उभाठा गटातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अविनाश पाटील, मानसी शेळके, वर्षा पंडीत यांच्यासह धीरज गडकरी, अनंता पाटील, अनिल पाटील, समिक्षा पाटील, नम्रता पाटील, शांताराम शेळके, नितेश गायकर, निलेश शेळके, माधूरी शेळके, मिलींद शेळके, नितीन शेळके, प्रियंका शेळके, विनोद पंडीत, सुरेश पंडीत, सचिन पंडित, सारिका पंडित, संदेश पंडीत, राहूल चोरघे, अनिल चोरघे, अविनाश चोरघे, संदेश नारायण पंडित, भावेश पंडित, जिजाबाई चोरघे, किशोर रघुनाथ पंडीत, किशोरी पंडीत, साहिल शेळके, विघ्नेश शेळके, संदिप पंडीत, नंदिनी पंडीत, प्रविण पंडित यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.