पनवेल(प्रतिनिधी) अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता यावा या हेतूने ही संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी स्थापन केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पहिला अबोली रिक्षा महिलेचा रिक्षा थांबा नवीन पनवेल येथील डि मार्ट येथे सुरु करण्यात आला. भारतीय जनता पक्ष हा देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना या संघटनेचे पदाधिकारी व महिला सदस्यांनी एकमताने जाहीर पाठिंबा देण्याचे ठरल्यानंतर त्या संदर्भातील पत्र लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी आज सुपूर्द केले. यावेळी प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार उपस्थित होते.
महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करुन देणारी महाराष्ट्रातील पहिली संघटना म्हणून अबोली महिला रिक्षा संघटना कार्यरत आहे. पनवेल, कामोठे, कळंबोलीमध्ये १३० महिला या संघटनेच्या सदस्या आहेत. आमचे पदाधिकारी, सदस्य यांनी एकमताने या विधानसभा निवडणुकीत कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठींबा देण्याचे ठरवले असल्याचे संतोष भगत यांनी यावेळी सांगितले. गेली १५ वर्षे पनवेलचे सक्षम आमदार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर कार्य करीत आहेत. केलेली विकासकामे पाहता आमदार प्रशांत ठाकूर हेच पनवेलचे भविष्य घडवू शकतात, असा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच अबोली रिक्षा महिला संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा देत असून भरघोस मतांनी निवडून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाहीही संतोष भगत यांनी या पाठिंबा पत्रातून दिली.
Be First to Comment