पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधनासभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रचारावेळी मतदारांना केले. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले तसेच आत्ता या योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये केले. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी म्हंटले.
पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजुन काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पनवेल मतदार संघातील नेरेपाडा, नेरे, सांगटोली, मालडुंगे ग्रामपंचायतीमधील विविध वाड्या, शिवनसई, तामसई, बोंडारपाडा, दुंदरे, दुंदरेपाडा, रिटघर आणि चिंचवली मध्ये प्रचार केला. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे माता भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. तसेच ज्येष्ठांनीही त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.
या प्रचारावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भुपेंद्र पाटील, युवानेते दशरथ म्हात्रे, माजी उपसरपंच रमेश पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, पंचायत समितीचेच माजी सदस्य राज पाटील, माजी सरपंच शांताराम चौधरी, राजेश भोईर, माजी सदस्य सुनील शेळके, माजी सरपंच एकनाथ पाटील, सदस्य निलेश पाटील, गोटीराम पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, ताई पाटील, माजी सदस्य कल्पना वाघे, पनवेल तालुका ग्रामीण युवा मोर्चा मंडळाचे कोषाध्यक्ष अमर शेळके, दयेश जांभळे, विठ्ठल शेळके, तुकाराम म्हसकर, संतोष शेळके, विकास भगत, विनायक भगत, अनंता पाटील, विजय शेळके, अनिल शेळके, नारायण शेळके, करण जांभळे, नामदेव डुकरे, मंगल पाटील, कचरू शेळके, शालिक शेळके, बारक्या शेळके, सुरेश शेळके, चंद्रकांत शेळके, समाधान पाटील, उमेश पाटील, गुरुनाथ भोपी, राजेश भोपी, राजन भगत, शरद भोपी, बाळकृष्ण भोपी, ग्रामपंचायत सदस्य प्रलय भोपी, गणेश भोपी, बाळुबुवा भोपी, गुलाब भोपी, नायारण चौधरी, विष्णू चौधरी, नकुल चौधरी, विलास खारुटकर, रामदास खारूटकर, डॉ. रोशन पाटील, मिलींद पाटील, महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कुंदा मेंगडे, अंकित घरत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते. प्रचाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद दिला.
Be First to Comment