Press "Enter" to skip to content

डिजिटल क्लासरूम प्रकल्पामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण प्रणालीने सुसज्ज

रायगड जिल्ह्यातील २४ जिल्हा परिषद शाळांमधील ९४ वर्गखोल्यांचे डिजिटल क्लासरूममध्ये रूपांतर

पनवेल (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपली सीएसआर शाखा, अर्थात इशान्य फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील २४ जिल्हा परिषद शाळांमधील ९४ वर्गखोल्यांचे डिजिटल क्लासरूममध्ये रूपांतर केले आहे. डिजिटल क्लासरूममुळे शिक्षणाच्या पद्धतीत क्रांती झाली आहे आणि त्यामुळे तळोजा आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामीण शाळांमधील असंख्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक संवादात्मक, आकर्षक आणि सुलभ झाले आहे. 

      खैरणे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश गोपाळ वर्तक म्हणाले,“डिजिटल क्लासरूम सुरू झाल्याने आमच्या शाळेत खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल झाला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवण्याचे आव्हान होते, पण आता संवादात्मक धडे आणि दृष्य साधनांमुळे त्यांची उत्सुकता आणि एकाग्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. या नव्या वातावरणात शिकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असल्याने उपस्थितीचे प्रमाण लक्षणीयरित्या सुधारले आहे. एकेकाळी समजावून सांगण्यास  अवघड असलेल्या संकल्पना आता विद्यार्थ्यांना समजणे आणि लक्षात ठेवणे सोपे झाले आहे.या उपक्रमामुळे त्यांची विषयांची समज तर सुधारली आहेच, शिवाय त्यांना शिकणेही आनंददायी झाले आहे. विद्यार्थ्यांनाही मौल्यवान संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही दीपक फर्टिलायझर्सचे आभारी आहोत”.

    “प्रत्येक वर्गात ५५ इंचाचा ब्रँडेड स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आणि डिजिटल स्वरूपात महाराष्ट्र राज्य मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रणालीचा दीर्घकालीन वापर व्हावा यासाठी,हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला तीन वर्षांची ऑनसाइट वॉरंटीसुद्धा आहे. दीपक फर्टिलायझर्सने आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल क्लासरूमबद्दल आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत.”असे रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय तळकरयांनी सांगितले.

      दीपक फर्टिलायझर्सचे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचेअध्यक्ष नरेश कुमार पिनिसेट्टी म्हणाले,“दीपकफर्टिलायझर्समध्ये आमचा असा विश्वास आहेकी सक्षम समाज तयार करण्यासाठी दर्जेदारशिक्षण मिळणे आवश्यक आहे. रायगडच्याजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटलक्लासरूम उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देणे, त्यांनासमज आणि उत्साह वाढेल अशा पद्धतीनेविषयांशी जोडण्यास मदत करणे हे आमचे ध्येयआहे. त्याचबरोबर या उपक्रमामुळे वर्गातीलउपस्थिती आणि सहभागावर कसा सकारात्मकपरिणाम झाला आहे हे पाहून आम्हाला अभिमानवाटतो आणि भावी पिढ्यांसाठी खऱ्या संधीनिर्माण करणाऱ्या शैक्षणिक प्रगतीस पाठिंबादेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.