Press "Enter" to skip to content

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा चांगला प्रतिसाद


पनवेल : महविकास आघडीचे लाडके उमेदवार मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचा पनवेल शहर (प्रभाग क्रमांक १४,१८,१९) प्रचार दौरा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या प्रचार दौऱ्याला परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक,महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयाला अभिवादन करून करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर शहरातील मिरची गल्ली, कोळीवाडा, रोहिदास वाडा, पंचरत्न-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढपुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष पंजाब हॉटेल, मारुती मंदिर, आदर्श हॉटेल, गावदेवी पाडा, कांदेचे घर, रीची रीच दुकान, जयभारत नाका, सावरकर चौक, प्रताप नगर, बिर्मोळे हॉस्पिटल, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल,वाल्मिकी नगर,बावन बंगलो,नवीन तहसील कॉर्नर, साईनगर,विट सेंटर, वाजी मोहल्ला, पटेल मोहल्ला, भारत नगर, भुसार मोहल्ला, कच्छी मोहल्ला, जामा मशीद या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली. मा. आमदार यांचे ठिकठिकाणी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बाळाराम पाटील यांना आमदार करायचेच असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रचार रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बाळाराम पाटील यांनी अनेक ज्येष्ठांचे आशीर्वाद देखील घेतले.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार बाळाराम पाटील यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.यावेळी जागोजागी माता- भगिनींनी आमदार बाळाराम पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.यावेळी युवकांनी जोरदार घोषणा देत आमदार बाळाराम पाटील यांच्या विजयाचा जयघोष केला. बाळाराम पाटील यांची निशाणी शिट्टी असून मतदारांनी शिट्टीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.