शिवसेनेचे प्रसाद भोईर हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार !
पत्रकार परिषदेत उपनेते विजय कदम यांचे स्पष्टीकरण
पेण(प्रशांत पोतदार)
पेण १९१ विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर हेच असून त्यांना मातोश्री वरून आशीर्वाद मिळाला आहे.
ते पक्षाचे एबीफॉर्म घेऊन व मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने प्रसाद भोईर हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे उपनेते विजय कदम यांनी पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी मांडले.
पेण विधानसभा मतदारसंघात शेकापचे अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवत असल्याने नक्की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत पेण शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय कदम यांनी प्रसाद भोईर हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे प्रसाद भोईर यांना एबी फॉर्म देऊन ते पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तसेच महाराष्ट्रातील ९६ उमेदवार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
मी अधिकृत मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे
तर यावेळी उमेदवार प्रसाद भोईर यांनी सांगितले की मी १९१ पेण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी मुख्य घटक असलेल्या शिवसेना पक्षाचे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे, कोणी उमेदवाराने काय बोलले हे आता बोलण्यासरखे नाही.मीच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असून २३ तारखेला आपल्याला कळेल की जनता कोणाला निवडून देईल.
यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाविकास आघाडी उमेदवार प्रसाद भोईर,
तालुका प्रमुख जगदीश ठाकूर,जिल्हा समन्वयक नरेश गावंड,सह समन्वयक समीर म्हात्रे,जिल्हाउपप्रमुख अविनाश म्हात्रे,महिला संघटक दिपश्री पोटफोडे आदी उपस्थित होते.
Be First to Comment