पेण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचाच विजय होणार – उमेदवार अतुल म्हात्रे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी प्रचाराचे मुद्दे मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन
पेण(प्रशांत पोतदार)
मी अतुल नंदकुमार म्हात्रे पेण विधानसभा मतदार संघात शेकाप पुरस्कृत महाविकास आघाडीतून अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणूक लढवत आहे.आज पासुन प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी प्रचाराचे मुद्दे मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केले.
यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पेण विधानसभा मतदार संघात जोरदारपणे महाविकास आघाडीचीच शिट्टी वाजणार असून ५० ते ६० टक्कयाहून अधिक मतदान होऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच विजय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रचारा दरम्यान मतदारांपुढे स्थानिकांसाठी विकास आराखडा मांडणार आहे.१९१ पेण विधानसभा मतदार संघात उमेदवाराची
माहिती मतदारांपर्यंत पोहचावी तसेच स्थानिकांचा रोजगार,पाणी प्रश्न,वीज आदी पायाभूत सुविधांनी ग्रासलेल्या मतदार संघाचा विकास कामाने कायापालट करून स्थानिकांना प्रकल्पातुन रोजगार मिळवून देणार असल्याचे सांगत.
पेण,पनवेल,अलिबाग शेकापक्ष उमेदवार महाविकस आघाडीने लढत आहेत तर उरण मध्ये शिवसेना उमेदवार महाविकस आघाडीने लढत आहे. येथील जनतेला अभिप्रेत असलेला विकास साधायचे आहे.येथे नक्कीच बदल घडणार आणि बदलाचं नावं अतुल म्हात्रे हे असणार.माझा विजय होणार आणि हा विजय जनतेचा असणार आहे.
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे पण जनतेने संभ्रम करणाऱ्यांना दूर ठेवावे.मी प्रामाणिकपणे विकास साधणार आहे अफवा पसरवण्याचे काम आमचे नाही तर पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय मिळवून देणार तसेच रखडलेल्या महामार्गा विषयी तांत्रिक दृष्ट्या लक्ष देऊन लंडन रिटर्न आर्किटे्क असल्याने आपले व्हिजन राबवून नियोजन करण्यात येईल असे आश्वासन पत्रकार परिषदेत उमेदवार अतुल म्हात्रे यांनी सांगितले.
तर आपली निशाणी शिट्टी असल्याने पेण विधानसभा मतदार संघात जनता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठी राहून जोरदारपणे
शिट्टी वाजवणार आणि आपला विजय मोठ्या मताधिक्याने होणार.
यावेळी महादेव दिवेकर,ॲड.रोशन पाटील,निलेश म्हात्रे, तुकाराम खांडेलकर गुरुजी आदी उपस्थित होते.
Be First to Comment