उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्यातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन पदाधिकारी कार्यकर्त्यानी केला एकच जल्लोष.
सर्वत्र प्रितम दादाचे स्वागत
सिटी बेल उरण (विठ्ठल ममताबादे )
शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जासई येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. उरण विधानसभा मतदारसंघातून महावीकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रीतम म्हात्रे यांनी अर्ज भरला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निवडणूक अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
उरण तालुक्यातील जासई येथे दि. बा.पाटील हायस्कूल जवळ मोकळ्या मैदानात शेतकरी कामगार पक्षाची भव्य दिव्य अशी सभा झाली. या सभेत विविध मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जेष्ठ नेते काका पाटील, माजी सभापती नरेश घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक,उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे,महिला तालुका अध्यक्ष सीमा घरत, शहर अध्यक्ष शेखर पाटील, शहर युवा अध्यक्ष कुंदन पाटील,माजी नगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी भाषण केल्यानंतर सर्वात शेवटी उरण विधानसभा मतदार संघांचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या, प्रश्नावर प्रकाश टाकला. तसेच आजही उरण विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित असल्याचे सांगत भाजपचे महेश बालदी यांच्यावर घणाघाती टीका केली. “लोकांना रोजगार नाही, पिण्याची पाणी उपलब्ध नाही, चांगले रस्ते नाही. वेगवेगळ्या सेवा सुविधा पासून जनता वंचित आहेत. महेश बालदी यांनी कोणताही विकास केला नाही. त्यामुळे जनता विकासापासून वंचित आहे. मला आमदार जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी बनायचे आहे. प्रामाणिक व चांगले काम करून जनतेचे आशीर्वाद पाहिजे. म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. मला विकासासाठी, बेरोजगार कमी करण्यासाठी व उरणच्या विकासासाठी बहुमताने निवडून दया ” असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून केले.
Be First to Comment