Press "Enter" to skip to content

हजारो कार्यकर्त्यांसमोर महेंद्रशेठ घरत यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीला जोर का झटका

उरण / वार्ताहर


आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांचेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत.सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांना भेटण्यासाठी शेलघर येथे आले असता उपस्थित हजारो कार्यकर्त्यासोबत महेंद्रशेठ घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत असताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की खरेतर लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता परंतु उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. पुढील विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता परंतु याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते मंडळींचे,आम्ही कोणत्याही पक्षाचे ओझे उचलणार नाही असे म्हणणे होते. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही असे ते म्हणाले.तसेच बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्री. श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला.जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्ष किंगमेकर असेल.

One Comment

  1. Sunil Shinde Sunil Shinde October 27, 2024

    Good news website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.