भोपाळ मध्ये पनवेलच्या शुटर्स चा दबदबा
पनवेल:प्रतिनिधी
वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलमधील रायफल शुटर रिया पाटील व आर्या पाटील या भगिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक व कांस्यपदक पटकावले आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान मध्यप्रदेश येथील एम पी स्टेट शूटिंग अकॅडमी, भोपाळ येथे वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दिव दमण, दादरा हवेली राज्यातील शंभराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलमधील रायफल शुटर कु.रिया अभिजित पाटील हिने डबल ट्रॅप ज्युनियर क्रीडा प्रकारात १ रौप्यपदक व डबल ट्रॅप सिनियर क्रीडा प्रकारात १ कांस्यपदक पटकावले आहे. तर कु.आर्या अभिजित पाटील हिने ट्रॅप ज्युनियर व डबल ट्रॅप ज्युनियर या दोन्हीही क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. कु. रिया व आर्या पाटील जेबीके शूटिंग फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक तेजस रमेश कुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत.
कु. रिया व आर्या पाटील यांचे वडील अभिजीत पाटील हे देखील राष्ट्रीय नेमबाज असून कु. रिया व आर्याच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कु.रिया व आर्या या दोघीही न्यू होरायझन स्कुल पनवेलच्या विद्यार्थिनी असून त्यांच्या या चमकदार कामगिरीबद्दल पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Be First to Comment