पनवेल तालुक्यातील वावंजे गावचे शेतकरी नामदेव गोंधळी यांच्या जमीनविक्री फसवणूक प्रकरणात न्याय मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकतीच त्यांनी नववी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या.२४ एप्रिल २०२३ रोजी उपजिल्हा अधिकारी व दंडाधिकारी यांनी दिलेल्या निकालात नियमबाह्य नोंद झाल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार सातबारा पुरवत करण्याचे आदेश देखील पारित झालेले आहेत. असे असले तरी देखील सातबारा पूर्वत झालेला नसल्याचे नामदेव गोंधळी यांचे म्हणणे आहे. अखेरीस नामदेव गोंधळी पुन्हा एकदा १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा मुख्यालयाच्या समोर आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत.
याबाबत मूळ हकीकत अशी की तक्रारकरते नामदेव शंकर गोंधळी यांच्या कुटुंबाच्या मालकीची वावंजे येथे सर्वे क्रमांक 123/2 वर 38.70 गुंठे जमीन आहे. कौटुंबिक वाटणी नुसार दक्षिणेकडील 18.70 गुंठे क्षेत्र त्यांच्या मालकीचे असून उत्तर दिशेकडील 17.70 क्षेत्र त्यांच्या काकांच्या मालकीचे आहे.
नामदेव गोंधळी यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी केलेल्या वचन चिठ्ठीनुसार सिद्धार्थ भल्ला यांना त्यांच्या हिश्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला.4 लाख 35 हजार रुपये प्रति गुंठा दराने सदरचा व्यवहार ठरला. परंतु सिद्धार्थ भल्ला यांनी सदर जमीन विक्रांत संसारे यांच्या नावाने विकत घेण्याचे निश्चित केल्यामुळे हे खरेदीखत नामदेव गोंधळी आणि विक्रांत संसारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत करण्यात आले. दरम्यानच्या कालखंडात नामदेव गोंधळे यांना कर्करोगाने ग्रासले. ते कामाला असलेल्या दीपक फर्टिलायझर्स कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांना अत्यंत उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळवून दिल्यामुळे ते या असाध्य रोगावरती मात करू शकले. त्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की यादरम्यान खोटे दस्तावेज बनवून सदरच्या खरेदी खतानुसार त्यांच्या काकांची जमीन देखील विक्री केली असे नमूद होते.
यानंतर सदर प्रकरणात गोंधळी आणखीन खोलात शिरून तमाम खोट्या दस्तावेजांची प्रत मिळवली. त्यांचे सहकारी व कंपनीतील कामगार युनियन चे जनरल सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे यांनी सदरचे प्रकरण सचिन भाऊ आहेर यांना देखील कळविले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास विनंती केली. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंदविण्याचा शेरा मारला असल्याचे गोंधळी यांना खात्रीलायक सूत्राकडून समजले आहे.
वास्तविक सदर जमिनीची पुनरमोजणी करण्याची विनंती देखील गोंधळी यांनी केली होती. सदर जमिनीतील सात एकर जमीन कॉरिडोर प्रकल्पात जाणार असल्याने त्यासाठीच तर हा सारा अट्टाहास केला नाही ना? असा संशय देखील निर्माण होतो. कर्करोग ग्रस्त नामदेव गोंधळी हे जमीन विकल्यानंतर या आजारातून बरे होतील याची शक्यता नाही असे गृहीत धरून कुणा एजंटाने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरत हा उपद्व्याप केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यानंतर गोंधळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने २४ एप्रिल २०२३ रोजी उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी दिलेल्या निकालानुसार या व्यवहारात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल करून नियमबाह्य काम झाल्याचे नमूद आहे. यातील आकारफोड पत्रकार केलेली खाडाखोड हाच या प्रकरणातील गाभा आहे. तूर्तास जमीन खरेदी पूर्वी जसा सातबारा होता तसा सातबारा करून घ्यावा व खोटे रिपोर्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी नामदेव गोंधळी यांची मागणी आहे.
दरम्यानच्या कालखंडात या प्रकरणात ज्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांनी तीन वेळा नामदेव गोंधळी यांच्यासोबत बैठका करून प्रकरण थांबविण्याचे अनुषंगाने गोंधळी यांना आश्वासन दिले होते. परंतु बैठक संपल्यानंतर माघारी गेले की या भूमाफियाना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडतो असा गोंधळी यांचा खणखणीत आरोप आहे.





Be First to Comment