एकाच दिवशी दोन कंपनी मधे पगारवाढीचे करार
सफाई कामगारांचे पगार तब्बल ५० हजार रुपये!
पनवेल/प्रतिनिधी.
मागील ३५ वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष,कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या नेतृत्व कौशल्याने सातत्याने कामगारांना न्याय देत आहेत. कामगारांच्या पगारवाढीबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात.
केलॉग्स इंडिया प्रा.लि.,तळोजा व रवि डायवेअर कं. लि., तळोजा या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचे करार एकाच दिवशी करण्यात आले.केलॉग्स इंडिया प्रा.लि या कंपनीतील सफाई कामगारांना ३ वर्षासाठी ९२०० रुपये पगारवाढ करण्यात आली. या पगारवाढीमुळे सफाई कामगारांचा पगार तब्बल ५० हजार रुपयांवर गेला आहे. तर रवि डायवेअर कं. लि या कंपनीतील ऑपरेटर्स साठी ११५००रुपये तर कामगारांसाठी १११०० रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे. या पगारवाढीनुसार या कामगारांचा पगारही ५० हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या करारनाम्यावर न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील यांनी स्वाक्षरी केल्या.
केलॉग्स कंपनीतर्फे प्लॅन्ट मॅनेजर श्री. चंद्रकांत पवार, प्लॅन्ट एच. आर. मॅनेजर श्री. अमरजित कुमार, एच. आर मॅनेजर श्री. प्रमोद वाडकर, एस. के. एन्टरप्रायजेसचे डायरेक्टर श्री. सुरेश खानावकर त्यांचे चिरंजिव संकेत खानावकर, अक्षय भोईर तर कामगार प्रतिनिधी श्री. भगवान डोंगरे, प्रकाश फडके, मारुती पाटील, मोहन फडके, दिलीप पोरजी आदि उपस्थित होते. तर रविडायवेअर कं. लि तळोजा कंपनीतर्फे डायरेक्टर श्री. विकास सरोगी, एच. आर चे श्री. आशिष कुमार तर कामगार प्रतिनिधी श्री. वसंत मुंबईकर जयदास गोंधळी, संतोष म्हात्रे आदि उपस्थित होते. दोन्ही कंपनीतील कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व सदैव आपल्या नेतृत्वाखाली राहणार असल्याचे आश्वासन दिले.
Be First to Comment