Press "Enter" to skip to content

आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा- सुलक्षणा सावंत 


पनवेल / प्रतिनिधी

लाडकी बहीण योजनेसह लोकहिताच्या अनेक योजना राज्यात सुरु आहेत. या योजना अशाच सुरु राहण्यासाठी राज्यात विद्यमान भाजप महायुतीचे सरकार आवश्यक आहे, त्यामुळे महिलांनी आपली ताकद येत्या विधानसभा निवडणुकीतही लावून आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी आणि गोवा राज्य महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी येथे केले. भाजप उत्तर रायगड महिला पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. 

          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुंद्रीमोती, भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, सरचिटणीस संध्या शारबिद्रे, वृषाली वाघमारे, पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, तालुका अध्यक्षा कमला देशेकर, यांच्यासह जिल्हा व मंडलातील पदाधिकारी उपस्थित होत्या. 

          सुलक्षणा सावंत यांनी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांना सहज आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या कि, सर्व क्षेत्रात महिला जबाबदारीने काम करत असतात, त्याचप्रमाणे राजकारणात महिला मोर्चाची ताकद मोठी आहे. तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली आहे ती तुमच्यामध्ये असलेल्या क्षमतेमुळे. हि ताकद विजयाचा झेंडा डौलाने फडकवणार आहे. ६ लाख ७४ हजार मतदार असेलला पनवेल विधानसभा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ आहे. लोकसभा निवडणुकीत पनवेलने मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थितरीत्या आणि गाफील न राहता काम केल्यास जिल्ह्यातील तीनही ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येईल, असा विश्वासही सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केला. 

            यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना म्हंटले कि, भाजप खोलवर रुजलेला पक्ष आहे त्यामुळे पक्ष लोकहिताचे निर्णय घेऊन सक्षमपणे काम करत आहे. आणि त्याच अनुषंगाने पक्ष संघटनेसाठी अपेक्षित असलेले काम महिला मोर्चाच्या वतीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.