मुंबई/ प्रतिनिधी.
● राज्यातल्या सर्व नागरिकांना, गणेश भक्तांना श्री गणेशाच्या आगमनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.
● गणरायाचं आगमन झालंय…. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो. सर्वाँना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना
● प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं.
● गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो
● यंदा राज्यात ससगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे… पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, बरोबर आहे. सगळी मदत केली जाईल.
● माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा… त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रय़त्न करूया.
● आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल असं पहा.
● सामाजिक आणि धार्मिक सलोखा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळं हे प्रेम – आदर आणखी वाढीस लागेल, असे प्रयत्न करु या.
● आपला महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन आहेच. वेगवेगळ्या आघाडयांवर आपण वेगानं काम करीत आहोत. देशाच्या विकासात महाराष्ट्राची मोठी भूमिका आणि योगदान असते.
● अनेक चांगल्या समाजिक योजना आपण सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होतंय…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत.
● परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे.
● श्री गणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू…
Be First to Comment