शेलघर/ प्रतिनिधी.
न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या पुढाकाराने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६ हजार रुपये पगारवाढ देण्याचा करार करण्यात आला. त्याचबरोबर या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोईसुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. हा पगारवाढीचा करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील उपस्थित होते तर व्यवस्थापनातर्फे संचालक जितेंद्र सिंग देवेंद्र सिंग यांच्या समवेत कामगार प्रतिनिधी अरुण ठाकूर, करण ठाकूर, आतिश ठाकूर, सुनील ठाकूर, अक्षय ठाकूर, समीर ठाकूर, मंगेश ठाकूर, आदी उपस्थित होते. गणपती सणापूर्वी कामगारांना पगारवाढ मिळाली असल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Be First to Comment