मा.आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सिडको मुख्यालयात सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या व इतर शाळांना वितरित करण्यात येणाऱ्या भूखंडाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तसेच सिडको हद्दीमध्ये अनेक सुरू असणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या उभारणी दरम्यान सामान्य जनतेला गृहीत धरले जात असल्याची खंत व्यक्त केली.
नावडे गावातील वाटपाचे शिल्लक भूखंड वाटपासाठी सूचना करून,गरजेपोटीची बांधकामे,नैसिर्गिकवाढीची बांधकामे गावठाणातील बांधकामे लवकरात लवकर नियमित करणे व तो पर्यंत सिडको अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात येऊ नये अशी आग्रही भूमिका माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी मांडली.
स्थानिक कॉरी धारकांचे प्रश्नावर व कॉरी सुरू करणे संदर्भात देखील त्यांनी विस्तृत चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांना त्यांचे देण्यात येणारे भूखंड हे स्थानिक गावामध्ये व मोक्याच्या ठिकाणी देण्यात यावे अशी सूचना देखील देण्यात आली.यावेळेस संबंधित सिडको अधिकारी उपस्थित होते.
सिडको प्रशासनाकडे मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या आग्रही मागण्या
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment