पनवेल (प्रतिनिधी)
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर’च्या मध्ये ‘मोफत जयपूर फूट’ शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे शिबिराचे १६ वें वर्ष आहे.अपंगत्व आलेले किंवा अपघातात हात व पाय गमावल्यामुळे जीवनाचा प्रवास खडतर होत असतो त्यामुळे यावर योग्य उपाय म्हणून तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम अवयवची निर्मिती झाली. त्यामुळे निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम हात पाय अर्थात जयपूरफुट मुळे भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सोबतीने जयपूर फुट शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही जयपूर फुट शिबिर या महाशिबिरात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी डॉ. अरुणकुमार भगत ९२२३५०५५५५, किंवा अनिल कोळी ९७६९४०९१६१ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे
Be First to Comment