नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी
पनवेल (प्रतिनिधी)
युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गर्शनाखाली शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात ‘भव्य रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https://prashantthakur.jobfairindia.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी ९९२०७६५७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Be First to Comment