जाणीव एक सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन
पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेलच्या वतीने शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे ‘भव्य चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
ज्युनिअर के.जी. ते पहिली, इयत्ता दुसरी ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात हि स्पर्धा होणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ३० जुलै असून स्पर्धेचे साहित्य (कंपास पेटी, पेन्सील, कलर ई.) प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे आणावे. स्पर्धकाला स्पर्धेच्या ठिकाणी चित्रकला पेपर व चित्राचा विषय देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व भेटवस्तु तसेच विजेत्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रसाद कंधारे – ८४५१८४२९१९, महेश सरदेसाई- ८४५४०४२९१९, प्रसाद हनुमंते- ७६६६३२७००९, परेश बोरकर- ९९८७३३१९९८, शैलेश कदम- ९३२०२०९९९१, राजा चव्हाण- ९९८७३३२२१३, सचिन नाझरे- ९८१९६७६५१८ किंवा विनीत मढवी- ७५०६५७८१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक व जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस, माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी केले आहे.
Be First to Comment