पनवेल/प्रतिनिधी.
BCCI कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित होता.दरम्यानच्या काळात हा प्लांट अदानी ग्रुपने टेकओव्हर केला त्यामुळे व्यवस्थापन बदलले व पगारवाढ करण्यासाठी न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेला संघर्ष करावा लागला. परंतु कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने यशस्वी मध्यस्थी करून कामगारांना ७००० रुपये पगारवाढ मिळवून दिली. त्याच बरोबर वाढत्या महागाई नुसार महागाई भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगार कायद्यानुसार बोनस, दिडलाख रुपयांची फॅमिली मेडीक्लेम देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या करारामुळे कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या करारा प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, अरुण म्हात्रे तसेच व्यवस्थापनाचे वतीने अनुप कुमार साहू (चिफ एक्झीक्युटिव्ह) व कामगार प्रतिनिधी विश्वनाथ गडगे, प्रदीप दत्ता, शिवनारायण त्रिपाठी, गौतम शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment