महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारतीय संस्कृती व पारंपारिक सण उत्सवाच्या माध्यमातून आजच्या बालपिढीत मूल्याधिष्ठित शिक्षण रूजवण्यासाठी सु. ए. सो. चे श्री. संत साईबाबा प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी” माऊली पालखी दिंडी सोहळा” आयोजित करण्यात आला.
तुळशी माळ, कपाळी गंध. हाती टाळ चिपळ्या, शुभ्र टोपी, व नऊवारी लेवूनी, तुळस वृंदावन घेऊनी सुगंधित भक्तीमय वातावरणात विठ्ठल नामाच्या श्वासातला विठ्ठल ऊर्जा नाद आसमंती दुमदुमत होता .अवघा रंग एक होऊन गजर कीर्तनात माऊली पालखी सोहळ्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
यावेळी आषाढी एकादशीच्या अख्खायिकेचे महत्त्व कथन करण्यात आले. भारतीय सण उत्सव माध्यमातून विद्यार्थ्यांची मनाची मशागत होऊन संस्कार मूल्याची पेरणी झाली पाहिजे ह्या दृष्टीने मुख्याध्यापिकेने उपक्रम राबवण्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर परिपाठात प्रतिभा मंडले, सांस्कृतिक विभाग यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली.. प्रार्थना घेऊन वातावरण निर्मिती केली. दिनविशेष याची माहिती सांगताना. कुमार मंडले सर, यांनी संतांची कामगिरी सामाजिक मूल्ये, जगण्याचे आत्मभान देणारी सर्व धर्म समभावाची मूल्याधिष्ठित आदर्श जीवन प्रणाली यांचे तत्त्वज्ञान सांगणारी वारी म्हणजेच ही आनंदवारी हे सोप्या भाषेत मुलांना समजावून दिले
ज्ञानबा माऊली तुकाराम|,जय जय राम कृष्ण हरी या जयघोषात श्री संत साईबाबा शाळेतील हे रंगबेरंगी पारंपरिक वेशभूषेतील विठ्ठल रखुमाई वमाऊलीची पालखी दिंडी निघाली वअवघा नवीन पनवेल परिसरविठ्ठल नामाच्या गजरात भक्तीमय अंतरंगाने न्हाऊन निघाला.
वेशभूषेतील छोटे वारकरी संप्रदाय पाहून अनेकांनी कौतुकास्पद शब्दसुमनांचा वर्षाव करत मनोभावे नमस्कार करून चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रतिभा मंडले , जयश्री सागरे ,सोनल पिसाळ. गायकवाड. सुनील तांडेल यांच्या नियोजनाने कार्यक्रमाची यशस्वीरिता सांगता झाली.
Be First to Comment