मुंबई/प्रतिनिधी.
कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलेले आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची सोमवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, वसई जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment